श्री तिरुपती बालाजी सतरावा ब्रम्होत्सव सोहळा

 



श्री तिरुपती बालाजी सतरावा ब्रम्होत्सव सोहळा

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) :  राजुरा तालुक्यातील  श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा  येथिल मंदिरात श्री बालाजीचा सतरावा ब्रम्होत्सव ( स्थापना दिवस ) सोहळ्या ची सुरवात ग्राम स्वचछता व रक्तदान शिबिराने मोठ्या जल्लोषात झाली. 

आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उद्या शुक्रवार दि. ९.१२.२०२२ सकाळी ७ ते १० वा.श्री बालाजीचा पंचामृत अभिषेक, आरती व प्रसाद. व नंतर सायं. ५ ते ६ श्री बालाजी चा साक्षगंध आरती व प्रसाद. रात्रौ ८.०० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व चुनाळा येथिल शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे.



Post a Comment

0 Comments