महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा वरोरा तालुका अध्यक्षपदी प्रवीन गंधारे तर सचिवपदी शहिद् अख्तर् यांची निवड.

 



महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा वरोरा तालुका अध्यक्षपदी प्रवीन  गंधारे तर सचिवपदी शहिद् अख्तर् यांची निवड.

 

वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा वरोरा तालुका अध्यक्षपदी दै.नवभारत चे तालुका प्रतिनिधी प्रवीन  गंधारे तर सचिवपदी अनिल शाहिद् अख्तर् यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर कर्याध्यक्षपदी मनिष भुसारी,उपाध्यक्षपदीआलेख रटटे,संघटक पदी राजेंद्र मर्दाने,कोषाध्यक्ष पदी डा.मुधोळकर, प्रसिद्धी प्रमुख पदी हरिष केशवानी,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी संबधाने पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, मावळते तालुका अध्यक्ष व सल्लागार बाळूभाऊ भोयर  यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी कार्यकारिणी सदस्य प्रदिपजी कोहपरे,प्रतिक माणुसमारे, नेरकर यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष, विदर्भ अध्यक्ष व पदाधिकार्याचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments