चंद्रपूर जिल्ह्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या, तर 4 नवीन पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल होणार
12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. छेरिंग दोरजे यांच्या दिनांक 30/12/2022 च्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या संदर्भात 8860/2022 च्या पत्रानुसार विहित कालावधी पुर्ण झालेल्या निशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झालेल्या असून यानुसार श्री. उमेश नागोराव पाटील, पोलिस निरीक्षक बल्लारपूर व श्री. प्रदीपकुमार पंढरीनाथ शेवाळे, चंद्रपुर यांची नागपूर ग्रामीण मध्ये बदली करण्यात आली आहे. यासोबत श्री. स्वप्नील धोंडीराम धुळे पोलिस निरीक्षक, दुर्गापूर यांची भंडारा व श्री. सत्यजित शशिकांत आमले पोलिस निरीक्षक गडचांदूर यांची वर्धा येथे बदली झाली असल्याची माहीती असून चंद्रपुर जिल्ह्यात 4 नवीन पोलिस निरीक्षक दाखल होत आहे. सूत्रांच्या माहीती नुसार नागपूर ग्रामीण येथून श्री चंद्रकांत राजमळ काळे व श्री असिफराजा बख्तावर शेख यांची चंद्रपुर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे तसेच भंडारा येथून श्री. मनोहर हिरालाल कोरेंटी व श्री. शिवाजी भिमराव कदम नवीन पोलिस निरीक्षक म्हणुन चंद्रपुर जिल्ह्यात दाखल होत आहे. याशिवाय वर्धा व भंडारा जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या संदर्भात निरीक्षकांचे नाव
1) श्री. आसिफराजा भक्तावर शेख, नागपूर ग्रामीण येथून चंद्रपूर बदली
2) श्री. चंद्रकांत राजमळ काळे, नागपूर ग्रामीण येथून भंडारा बदली
3) श्री. अनिल मोहन रेड्डी जिट्टावार, नागपुर ग्रामीण येथून चंद्रपुर बदली
4) श्री. निलेश महादेवराव ब्राह्मणे , वर्धा येथून भंडारा बदली
5) श्री. राजेंद्र त्रंबक शेटे, वर्धा, दोन महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने बदलीस स्थगिती
6) श्री. रवींद्र अण्णाजी मानकर, भंडारा येथून नागपूर ग्रामीण बदली
7) श्री. मनोहर हिरालाल कोरेटी, भंडारा येथून चंद्रपूर बदली
8) श्री. शिवाजी भिमराव कदम, भंडारा येथून चंद्रपूर बदली
9) श्री. उमेश नागोराव पाटील, चंद्रपूर येथून नागपूर ग्रामीण बदली
10) श्री. प्रदीप कुमार पंढरीनाथ शेवाळे, चंद्रपूर येथून नागपूर ग्रामीण बदली
11) श्री. स्वप्निल धोंडीराम धुळे, चंद्रपूर येथून भंडारा बदली
12) श्री. सत्यजित शशिकांत आमले चंद्रपूर येथून वर्धा बदली






0 Comments