अल्कोहोलीक्स् ॲनोनिमस् बल्हारशाह फैलोशिप द्वारे राष्ट्रीय परिषद
◾शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता स्थळ : गोंडराजे नाट्यगृह बल्लारपूर
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : अल्कोहोलीक्स् ॲनोनिमस् ही आंतरराष्ट्रीय संगत असुन यासंगतीच्या माध्यमातून हजारो मद्यपिडीत मद्यपासून दुर होउन आपल्या कुंटुबियांसह आंनदी व समाधानी आयुष्य जगत आहेत. बल्लारपूर येथे स्थापन होउन २७ वर्ष पुर्ण होत आहेत हे महोस्तवी वर्ष साजरे करण्यासाठी बल्लारपूर येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेचे उद्घाटन व जनजागरण सभा शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता स्थळ : गोंडराजे नाट्यगृह बल्लारपूर ( कला मंदिर पेपर मिल ) येथे आयोजित होत असुन मा.डॉ. श्री.अरविंद साळवे ( मा.पो.से. ) पोलीस अधिक्षक , चंद्रपूर, मा .श्री. विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, मा.श्री. प्रविण शंकर जी. एम. हुमन रिसोर्स बी.जी.पी.पी.एल बल्लारपूर, मा.डॉ. रजनी ताई हजारे समाजसेविका बल्लारपूर,मा.डॉ. श्री.प्रमोद महाजन ए.ए.वर्ग 'अ' विश्वस्त, मा.श्री.दिलीप बुराडे मॅनेजर एम. पि.बिरला सिंमेट मैहर, मध्य प्रदेश मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सामील होण्यास कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. ह्या संगतीत कोणत्याही धार्मिक, सामाजीक किंवा राजकीयपक्षाशी संबंध नाही. या संगतीला बल्लारपूर येथे स्थापन होउन २७ वर्ष पुर्ण होत आहेत हे महोस्तवी वर्ष साजरे करण्यासाठी बल्लारपूर येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.





0 Comments