ऑनलाईन घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण व कोरोना योद्धाला सन्मान



ऑनलाईन घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण व कोरोना योद्धाला सन्मान

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  न्यू मयुर शारदोत्सव मंडळ विसापूर यांचा सयुक्त विद्यमाने सुरजभाऊ टोमटे ( ग्राम पंचायत सदस्य ) SS फोटोग्राफी मित्र परिवार यांचा तर्फे आयोजीत "ऑनलाईन घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे" बक्षिस वितरण करण्यात आला.त्याच प्रमाणे "कोरोना काळा मध्ये विसापूर येथील औट पोष्ट पोलीस चौकी चे कर्मचारी यांचा "कोरोना योद्धा सन्मान-2022 म्हनून श्री.जिवन पाल, श्री.दुष्यंत गोडबोले, श्री.शिवराज वाघमारे, श्री.घनश्याम साखरकर यांचा मान्यवरांचा हस्ते "शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह"देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच प्रमाणे विसापूर येथील दोन तरुण युवकांनी "अग्निवीर सैन्य भरती मध्ये यश मिळवले श्री.विशाल सुभाष परसूटकर, श्री.कुणाल सुरेश डांगे यांचा सहपरिवारचे मान्यवरांकडून शाल,श्रीफळ,आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावर्षी प्रथमच गावातील शारदा मंडळातील आकर्षक मूर्ती,सुंदर देखावा सादर करनार्या मंडळाला सुद्धा सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू सुरभी शारदा मंडळ, द्वितीय क्रमांक न्यू मिलन शारदा मंडळ शारदा मंडळ आणि विशेष पुरस्कार श्री. साई शारदा मंडळ यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.किशोरभाऊ पंदीलवार ( अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी बल्लारपुर ताल्हुका ) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संदीपभाऊ पोड़े ( भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रपुर जिल्हा ) ग्राम पंचायत सदस्य श्री.दिलदारभाऊ जयकर, श्री.गजाननभाऊ पाटणकर, श्री.प्रदिपभाऊ गेडाम  सामाजिक कार्यकर्ते, श्री.गणेशभाऊ टोंगे ग्राम पंचायत सदस्या सौ.विद्याताई देवाळकर, सौ.सुरेखाताई इटनकर या कार्यक्रमा प्रसंगी न्यू मयुर शारदा मंडळाचे अध्यक्ष श्री.सुरजभाऊ टोमटे, सौ.विद्याताई देवाळकर, श्री.संदीपभाऊ पोड़े. श्री.किशोरभाऊ पंदीलवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निकीता आडकीने यांनी केले आभार प्रदर्शन श्री.सुरज टोमटे यांनी मानले कार्यक्रमाला यश्ववी करण्यासाठी न्यू मयुर शारदोत्सव मंडळाच्या सर्व पदाधीकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments