बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे विविध समस्याबाबत तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

 





बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे विविध समस्याबाबत तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

◾शहरात  नजूल जागेच्या नागरिकांना जमिनीचे पट्टे ध्या !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात  नजूल जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून घर बांधणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे  मिळाले नाही.  शहरातील कालरी परिसरातील डागाचे जमिनीवरील, डेपो विभागातील राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, रवींद्र नगर, गौरक्षण वॉर्डतील वन भूमीवरील आणि नजूल जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून घर बांधणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे. 

संतोषीमाता वॉर्डतील सुचकचे जागेवरील रहिवाशांचे जागेचे डायवरशन झाले पाहिजे, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे अनुदान नियमित मिळाले पाहिजे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे वारसांना 50,000/- रुपये अनुदान मिळाले पाहिजे, सरकारी स्वास्थ धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य मिळाले पाहिजे इत्यादी नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना घेऊन बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास मालार्पण करून धरणे आंदोलन प्रारंभ झाले. संचालन आसिफ शेख यांनी केले, प्रास्ताविक श्री. सरफराज शेख यांनी केले, मनोज उमरे, रेखाताई मेश्राम, आशा ताई भाले, यांनी मार्गदर्शन केले आघाडीचे अध्यक्ष भारत थुलकर यांनी शासनातर्फे बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्या अन्यथा शहर विकास आघाडी तर्फे तीर्व आंदोलन घेण्यात येईल असा इशारा दिला. मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांना देण्यात आले.



Post a Comment

0 Comments