सेवा पंधरवडा अभियानांतर्गत बल्लारपूर तालुकास्तरावर आठवड्यातून दोन दिवस विशेष शिबीर











सेवा पंधरवडा अभियानांतर्गत  बल्लारपूर तालुकास्तरावर

आठवड्यातून दोन दिवस विशेष शिबीर



 बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर )  : राज्य   शासनाच्या सुचनेनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत 10 सप्टेंबर 2022 पर्यंत विविध विभागांकडे असलेले नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी आदी निकाली काढण्यात येईल.तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि शनिवार  आज दिनांक 17/0 9/ 2022 रोजी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालय बल्लारपूर येथे डॉ. कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर यांचे अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित अर्ज तक्रारी यांचा निपटारा करण्याकरिता राज्य  शासनाचे निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


सदर कार्यक्रमास सर्वप्रथम राष्ट्रगीताची गायन करून सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर ह्या होत्या तसेच श्री. सतीश साळवे नायब तहसीलदार, महेंद्र फुलझले नायब तहसीलदार, श्री. शेंडे नायब तहसीलदार, विविध सामाजिक संघटना, स्वस्त धान्य दुकानदार संघटना आदी मान्यवर उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात 10 जातीचे प्रमाणपत्र, 9 उत्पन्नाचे दाखले, 6 शपथ पत्र, 5 शिधापत्रिका, 8 लोकांना खावटी स्वरूपात पाच हजार रुपयाचे दणधनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता सुनील तुंगीडवार, गजानन उपरे, दीपक वडूळे, अजय गाडगे ,चंदू आगलावे, महेंद्र कन्नाके, प्रमोद अडवाले, अजय नावकरकर, निकिता रामटेके, स्मिता डांगरे, श्रीमती बरचांने, आदी कर्मचारी यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन दीपक वडूळे यांनी केले उपस्थांचे आभार लोकरे यांनी मांनले.

Post a Comment

0 Comments