थकीत पाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा २% अतिरिक्त दंडाची आकारणी आणि नळजोडणी बंद होणार

 







थकीत पाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा २% अतिरिक्त दंडाची आकारणी आणि नळजोडणी बंद होणार

 
चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील पाणी कर वसुली सुरु असून आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी थकबाकी आहे. शहरातील नळधारकांनी थकीत भरणा त्वरित न केल्यास २% अतिरिक्त दंडाची आकारणी आणि नळजोडणी बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासक यांनी पाणी कर वसुली पथकप्रमुखांना दिले आहेत.
     थकीत पाणी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स,  झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे.
     शहरातील नागरिकांनी अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तसेच नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments