कॉमेडीचा किंग आणि अभिनेता राजू श्रीवास्तवचे निधन

 









कॉमेडीचा किंग  आणि अभिनेता राजू श्रीवास्तवचे निधन 

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.कॉमेडी किंग  आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांनी आज वयाच्या 59 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

कॉमेडीच्या दुनियेत आपला खास ठसा उमटवलेले अभिनेता-कॉमेडियन राजू श्रीवास्तव आपल्या कॉमेडीमुळे नेहमीच चर्चेत असयाचे. छोट्या पडद्यावरील 'गजोधर भैया' या नावाने प्रसिद्ध असलेले राजू श्रीवास्तव आपल्या मजेशीर जोक्सने सर्वांचे मन जिंकली होती.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या कॉमिक टायमिंगचे संपूर्ण जगाने कौतुक केले असून त्यांना कॉमेडी किंगचा किताबही मिळाला आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये पहिल्यांदाच राजूने टीव्हीवर येऊन लोकांना हसवले. या शोमधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या शोमध्ये राजू  यांना 'द किंग ऑफ कॉमेडी' ही पदवीही देण्यात आली होती. राजू श्रीवास्तव यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. 

59 वर्षीय राजू श्रीवास्तव  अभिनयाच्या दुनियेतही हात आजमावला आहे. मैने प्यार किया, बाजीगर, आमनी अथनी और खरचा रुपय्या , मैं प्रेम की दिवानी, बिग ब्रदर इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे.

Post a Comment

0 Comments