सराफा आसोशिएशन मातेच्या आठ किलो चांदिच्या मूर्तीसह काढणार शोभायात्रा

 





सराफा आसोशिएशन मातेच्या आठ किलो चांदिच्या मूर्तीसह काढणार शोभायात्रा

◾महाकाली मंदिरात पोहचणार आठ किलो मातेची चांदीची मूर्ती


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  माता महाकाली सेवा समितीच्या वतीने आयोजित श्री. माता महाकाली महोत्सवा करिता आठ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदिची मुर्ती देण्याची घोषणा सराफा असोशिएशनच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान उद्या शनिवारी सराफा असोशिएशन सदर मुर्तीसह शोभायात्रा काढणार असून मातेची मूर्ती  महाकाली मंदिराला सुपूर्त करणार आहे.

   1 आॅक्टोंबर पासुन माता महाकाली मंदिराच्या पटांगणात आयोजित महाकाली महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सदर कार्यक्रम भव्य करण्याच्या दिशेने माता माहाकाली सेवा समीती आणि महाकाली भक्तगंणाच्या वतीने प्रयत्न केल्या जात आहे. यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सदर महोत्सव दरम्याण 2 ऑक्टोंबरला निघणा-या माता महाकाली नगर प्रदक्षिणेसाठी आठ किलो वजनाची मातेची चांदिची मुर्ती देण्याची घोषणा सराफा आसोशिएशनच्या वतीने करण्यात आली होती. सदर मुर्ती तयार झाली असुन उद्या शणिवारी शोभायात्रा काढत मातेची मुर्ती महाकाली मंदिर येथे नेण्यात येणार आहे. त्यानतंर तेथे मुर्तीची विधीवत पुजा केली जाणार आहे. सदर शोभायात्रा सराफा लाईन येथील जैन मंदिरा जवळून सुरु होणार असुन अंचलेश्वर मार्गे माता महाकालीच्या मंदिरात पोहचणार आहे. या शोभायात्रेत माताच्या भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहण सराफा असोशिएशनचे शहर अध्यक्ष भारत शिंदे यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments