सिध्दबली पूर्व कामगारांना कामावर घेण्याचे व थकीत वेतन संदर्भांत आठवड्यात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सिध्दबली पूर्व कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी व पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिध्दबली व्यवस्थापनासोबत दि. 21 रोजी पार पडलेल्या बैठकीत पूर्व कामगारांना पुर्ववत कामांवर सामावून घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 22 सप्टेंबरपासून सहा. कामगार आयुक्तांकडे आवेदन सादर करण्याची सुचना कामगारांना केली आहे. याबरोबरच सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचा सहा वर्षांचा थकीत वेतन 50 टक्के गृहीत धरुन संपूर्ण अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती हंसराज अहीर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत सिध्दबली व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी, सहा. कामगार आयुक्त, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे तालुका महासचिव विजय आगरे, विनोद खेवले, कामगार प्रतिनिधी उत्तम आमडे यांचेसह पूर्व कामगार व प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते. मागील वर्षभरापासून हंसराज अहीर व कामगार प्रतिनिधी सिध्दबलीच्या पूर्व कामगाराना कंपनी सुरु झाल्याने पूर्ववत कामावर सामावून घेत त्यांचे थकीत वेतन व अंतिम देय राशी कंपनीने द्यावी. यासाठी प्रयत्नरत होते परंतु कंपनीच्या आडमुठ्या धोरणाचा फटका या कामगारांना आतापर्यंत बसत होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी या पूर्व कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गांभीर्याने दखल घेत कामगारांना पूर्ववत रोजगार मिळण्याकरिता 22 सप्टेंबर पासुन सहा. कामगार आयुक्तांकडे आवेदन सादर करण्याचे कामगारांना सुचित केल्याने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.









0 Comments