घटस्थापनेच्या मुहुर्तावर माता महाकाली महोत्सवाचे मंडप पुजन

 


घटस्थापनेच्या मुहुर्तावर माता महाकाली महोत्सवाचे मंडप पुजन


 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  1 ऑक्टोंबर पासून चंद्रपूरातील माता महाकाली मंदिराच्या पटांगणात आयोजित माता महाकाली महोत्सवाचे मंडपपूजन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, माता महाकाली सेवा समितीचे अजय जयस्वाल, अॅड. विजय मोगरे, मुन्ना व्यास, महादेवराव पिंपळकर, रुपेश कुंदोजवार, वंदना भागवत,  प्रा. श्याम हेडाऊ, वंदना हातगावकर, कौसर खान, सविता दंडारे, आशा देशमूख, दुर्गा वैरागडे, विनोद अनंतवार आदींची उपस्थिती होती. 

   आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तथा महाकाली भक्तगण यांच्या वतीने आयोजित माता महाकाली महोत्सवासाठी माता महाकाली सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीच्या वतीने महोत्सावाचे भव्य नियोजन केल्या जात आहे. दरम्याण आज घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर महोत्सवाचे मंडपपुजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधीवत पुजन करुन महोत्सवाच्या भव्य मंडप उभारणीला सुरवात करण्यात आली.



Post a Comment

0 Comments