हंसराज अहीर यांनी घेतले "चंद्रपूरचा राजा" च्या गणेशमुर्तीचे दर्शन घेवुन महाआरती करुन सर्वांच्या सुखाची केली कामना

 







हंसराज अहीर यांनी घेतले "चंद्रपूरचा राजा" च्या गणेशमुर्तीचे दर्शन घेवुन  महाआरती करुन सर्वांच्या सुखाची केली कामना

◾वणी तालुक्यातील बाबापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात ग्रामस्थांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेताना पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सार्वजनिक गणेशोत्सव महासोहळा अत्यंत भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. चंद्रपूर महानगरात अनेक सार्वजनिक मंडळानी श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली असुन विविध कलाकृती व विलोभणीय देखाव्याव्दारे गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अनेक सार्वजनिक गणेशमंडळांना भेट दिली व या मंडळांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. जटपुरा युवक गणेश मंडळाला भेट देवुन "चंद्रपूरचा राजा" च्या गणेशमुर्तीचे दर्शन घेवुन या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमवेत महाआरती केली.


या गणेशोत्सव सोहळ्याचे पावित्र्य राखत सर्व मंडळांनी चंद्रपूर महानगर व जिल्ह्यांतील परंपरेने चालणारा आदर्श कायम ठेवत हा सोहळा शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन त्यांनी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले. जटपुरा युवक गणेश मंडळाचे संस्थापक दिपक बेले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाल व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान केला. यावेळी रवि लोणकर यांचेसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

सर्वसामान्यांमध्ये समरस होणारा लोकनेता, लाडके व्यक्तिमत्व, लोकसंग्रही नेतृत्व, विनम्र स्वभाव व साधेपणाचा समुच्चय असलेले लोकप्रिय नेते, देशाचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री आदरणीय हंसराज जी अहीर वणी तालुक्यातील बाबापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात ग्रामस्थांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेताना.




Post a Comment

0 Comments