बल्लारपुरात नवीन मुख्याधिकारी विशाल वाघ यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत !

 







बल्लारपुरात नवीन मुख्याधिकारी विशाल वाघ यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत !

◾बल्लारपूर शहर पडले 'VI' च्या प्रेमात 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात मागील 1 महिन्यापासून मुख्याधिकारी पदी प्रभारी पद्धतीने कार्यभार सुरु होता तसेच सद्यस्थितीत नगरपरिषद सदस्य व अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामूळ नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती कऱण्यात आली आहे.  बल्लारपुरात पुलगाव वरुन तिन महिन्याकरिता बदलून आलेल्या विजय देवळीकर सरांच्या सेवानिवृत्ती नंतर बल्लारपूर नगर परिषदचा कार्यभार प्रभारी पद्धतीवर सुरु होता येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पूर्णवेळ मुख्याधिकारी असावेत म्हणुन महाराष्ट्र शासनाने गडचिरोली येथे मुख्याधिकारी पदी कार्यरत असलेले विशाल वाघ यांची बल्लारपूरच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती कऱण्यात आली.  मा. विशाल वाघ यांनी बल्लारपूर नगर परिषदच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने विशाल वाघ सरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत कऱण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष मनोहर दोतपल्ली, वसंत मून, दिपक भगत, प्रशांतजी भोरे, ज्ञानेंद्र आर्य ( पत्रकार बांधव ) ई ची उपस्थिती होती. 

        विशेष बाब म्हणजे बल्लारपूर शहर 'VI' च्या प्रेमात पडलं की काय अशी चर्चा बल्लारपूर शहरात सद्यस्थितीत सुरु आहे कारण बल्लारपूर शहराला लाभलेले सलग 4 मुख्याधिकाऱ्यांची नावे VI अक्षरावरून सुरु होतात विपीन मुद्दा, विजय सरनाईक, विजय देवळीकर व सद्यस्थितीत नुकतेच नवीन मुख्याधिकारी म्हणुन लाभलेले विशाल वाघ यांचंही नाव VI वरूनच सुरु होतात.





Post a Comment

0 Comments