बल्लारपूर नगर परिषदेचे नवीन मुख्याधिकारी पदी विशाल वाघ यांची नियुक्ती
◾गडचिरोली वरुन बल्लारपुरात बदली, 5 सप्टेंबरला पदभार स्वीकारला
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहर दुसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणुन ओळखले जाते उच्च प्रतीचं सागवान लाकूड, जागतिक कीर्तीचा कागद कारखाना, ऐतिहासिक महत्व असलेल्या शहरातील प्रशासकीय व्यवस्था (नगर परिषद) मागील एक महिन्यापासून मुख्याधिकाऱ्याविना होती प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन चंद्रपुरातील ढोक सर कार्यभार पाहत होते.
बल्लारपूर शहराला मुख्याधिकारी पद काय असत याबद्दल विपीन मुद्दा सरांच्या कार्यकाळात कळले त्यांनी नागरिकांच्या लोकसहभागातून स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर उपक्रम राबविला त्यानंतर मूल येथील श्री. विजय सरनाईक सर व त्यांच्या बदली नंतर बल्लारपूर नगर परिषद ला तीन महिन्या करिता पुलगाव येथून आलेले मुख्याधिकारी श्री. विजय देवळीकर सर सेवानिवृत्त झाल्याने मागील एक महिना पासून रिक्त असलेले मुख्याधिकारी पदी गडचिरोली वरून आलेले विशाल वाघ नवीन मुख्यधिकारी म्हणून आज दि. 5 सप्टेंबर रोजी विराजमान झाले नगर परिषद बल्लारपूर ला नवीन मुख्याधिकारी म्हणून राज्य सरकारने गडचिरोली वरून बल्लारपूर ला गट-अ संवर्गतील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणासत्व सक्षम प्राधिकारण्याचा मान्यतेने बदली करण्यात आले. बल्लारपूर वासीयांना नवीन मुख्यधिकारी विशाल वाघ रुजू झाल्याने आनंद व्यक्त करीत आहे.









0 Comments