चंद्रपूरपुरात जीर्ण असलेली 3 मजली इमारत कोसळली
◾3 ते 5 व्यक्ती इमारतीखाली दबले असल्याची भीती !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास स्थानिक घुटकाळा वॉर्ड राज मंगलकार्यालयाजवळील एक जीर्ण तीन मजली इमारत कोसळली. यामुळे परिसरात एकच खळबड उडाली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली तीन लोक दबून असल्याचे कळते, यातील एका व्यक्तीचे भ्रमणध्वनीद्वारे संभाषण सुरू आहे.घटनास्थळी मनपाचा अग्नशमन विभाग, शहर पोलिस व बचाव कार्य पथकाला पाचारण करण्यात आले असून आत दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांची देखील मोठी गर्दी जमा झाली आहे. आतमध्ये एकंदरी किती लोक आहे, याचा अंदाज सध्या प्रशासन घेत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.







0 Comments