राजुरा तालुका येथील रामपूर मध्ये खड्ड्या विरोधात महिला आक्रमक प्रशासनाला धसका लगेच कामाला सुरुवात.





राजुरा तालुका येथील रामपूर मध्ये खड्ड्या विरोधात महिला आक्रमक प्रशासनाला धसका लगेच कामाला सुरुवात.

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तहसील येथील रामपूर सास्ती रोडवर अनेक जीव घेणे खड्डे पडले आहेत. त्यात काम अतिशय संथ गतीने चालू आहेत. दिवसा आड छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे कर्मचारी विद्यार्थी व महिलांना मोठ्या प्रमाणात गैर सोय व जीव मोठीत घेऊन येना जाणा करावी लागत आहे. 

या विरोधात महिला आक्रमण होऊन खड्ड्यावरती रांगोळी व वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले जेणेकरून प्रशासनाला जाग येणार त्वरित काम सुरू व झाल्यास आंदोलनाचे स्वरूप अजून तीव्र राहील ही भूमि रामपूरच्या सौ. लता डकरे यांनी केली. आंदोलनाचा धसका घेऊन प्रशासनाने तालुक्याचा कामाला सुरुवात देखील त्वरित केली.या आंदोलनात प्रसंगी सौ. संगीता विधाते, सौ. लता डखरे, श्री. जगदीश बुटले, सचिन शिरसागर, गिरडकर, मून ताई, गजभे ताई, हरिहर ताई, तिखे ताई, मालेकर ताई, नळे ताई, बारशिंगे ताई,बोबडे ताई आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments