बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
◾रक्तदान शिबिरामध्ये 75 लोकांनी केले रक्तदान
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सववानिमित्त बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ.कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यां ची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये डॉ. दीप्ती सूर्यवंशी, नायब तहसीलदार सतीश साळवे, निरीक्षण अधिकारी भरत तुबडे, कोषागार अधिकारी पंकज खनके, शैलेश धात्रक, सुनील चांदेवार, ॲड. गणेश जगताप, दीपक वडुळे, अजय गाडगे, चंदू आगलावे, गजानन उपरे, प्रमोद अडबाले, अजय नवकरकर, शंकर खरूले इत्यादी अधिकारी व कर्मचा-यांसह एकूण 75 जणांनी रक्तदान केले.
यावेळी उपविभागीय अभियंता श्री. मुत्तलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, राजू धांडे, कर्मचारी महसूल संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय राजुरा येथील कर्मचारी, आशा वर्कर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, रास्त भाव दुकानदार संघटना, अमन पसंद बहुउद्देशीय संस्था, सेव फॉरेस्ट सेव चंद्रपूर संस्था, रोटारॅक्ट क्लब, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले ही अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. सदर शिबिरामध्ये महिलांचा सहभाग हा विशेष होता.
सदर रक्तदान शिबिराचे यशस्वितेकरिता वैद्यकीय टीम,तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सतीश साळवे,चंद्रशेखर तेलंग, महेंद्र फुलझेले, सुनिल तुंगीडवर,गजानन उपरे,दीपक वडुळे, अजय गाडगे,चंदू आगलावे,प्रमोद आडबाले, सचिन पुणेकर,कुणाल सोनकर,महेंद्र कन्नाके, शंकर खरूले,शंकर खोब्रागडे,दिपाली आत्राम, प्रियंका खाडे,निकिता रामटेक,अर्चना गोहने, स्मिता डागरे,श्रीमती बारचॅन,युगंधर आत्राम इत्यादी कर्मचाऱ्यांनी मागील पाच ते सहा दिवसांपासून अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. दिपक वडुळे महसूल सहाय्यक यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार कुमारी प्रियंका खाडे यांनी मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





.jpeg)




0 Comments