बल्लारपूर येथे एक दुर्देवी घटना स्वतंत्रदिनी घडली एसटीच्या कर्मचाराची आत्महत्या
◾एसटीच्या दोन अधिकाऱ्यांच्या त्रासापायी आत्महत्या
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहर जिथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करत असतांना मात्र आजही असे अनेक कामगार आपल्या वरिष्ठांच्या त्रासापायी कंटाळले जात असतांना आत्महत्येचा मार्ग पत्करतात त्यामुळं कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होत असतांना दिसतात असाच प्रकारची एक दुर्दैवी घटना बल्लारपूर शहरात घडली .
बल्लारपूर शहरातील कन्नमवार वॉर्ड येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये कार्यरत असलेले भगवान अशोक यादव वय ( 30 ) वर्षे, ते राजुरा एसटी डेपो टीसी पदावर कार्यरत होते. त्याचा जवळ एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये अधिकारी पैश्याच्या मागणी करिता सारखा तगादा लावत असल्याचे म्हटले आहे. यांनी दोन अधिकाऱ्यांच्या त्रासापायी व जाचाला कंटाळून स्वातंत्र्य दिनीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली आहे.
विशेष म्हणजे भगवान ची पत्नी रक्षाबंधन च्या सणाकरिता माहेरी गेली असता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास घटना घडल्याची सूत्रांची माहिती आहे. मित्रांसोबत बोलणं झाल्यावर आईने जेवायला वाढले मात्र त्यांनी आईला उशिरा जेवतो म्हणुन आईला झोपायला सांगितले. मात्र मनात चलबिचल सुरू असलेल्या भगवान ने आत्महत्येचा मार्ग पत्करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा केला असता भगवानच्या खिशात सुसाईड नोट मिळाल्याचे सूत्रांकडून माहीती मिळाली असून या आधारे एसटी डेपो मधील दोन अधिकारी वारंवार मला पैशाची मागणी करतात व पैसे न दिल्यास मानसिक छळ करतात व त्यांच्या त्रासापायीच व जाचाला कंटाळून मि आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. पोलिसांनी सदर सुसाईड नोट जप्त केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.







0 Comments