चंद्रपूर शहरात ज्युबली हायस्कुल परिसरात युवकाची हत्या !

 




चंद्रपूर शहरात ज्युबली हायस्कुल परिसरात युवकाची हत्या !

चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी व सतत वर्दळ असलेल्या ज्युबली हायस्कुल शाळेच्या आवारातील शासकीय इमारतीच्या छतावर एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. सूत्राच्या माहितीनुसार सदर युवकाच्या मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आढळून आल्याने शंकाकुशंका ना पेव सुटले आहे. मारेकऱ्यांनी सोबत दारू पिऊन त्या युवकाची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मृत युवकाच्या डोक्यावर दारू पिऊन बॉटल फोडल्याच्या खुणा दिसून येत आहे तसेच मृतदेहाचे हात व पाय सेलो टेप ने चिपकविण्यात आले होते अद्याप पर्यंत मृत व्यक्तीचे नाव कळू शकले नाही चंद्रपुर शहर पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत असून लवकरच या हत्येचा प्रकरणाचा उलगडा होईल असा अंदाज आहे.

Post a Comment

0 Comments