तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन

 







तृतीयपंथीयांचे ओळखपत्र  प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन

 सकाळी 11 ते 5 या ेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्याकरिता, दि. 13 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 5 या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्यायभवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तृतीयपंथीयांचे ओळखपत्र  प्रमाणपत्रासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींनी या शिबिराला विहित वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments