भीषण अपघात 2 मुलींचा घटनास्थळीच मृत्यू

  






भीषण अपघात  2 मुलींचा घटनास्थळीच मृत्यू 

◾राजुरा-गडचांदूर रोडवरची घटना 

राजुरा  ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या महत्वाचा असून विशेष म्हणजे राजुरा गडचांदूर परिसरात अनेक खाजगी कम्पनी असल्यामुळं वाहतुकीची सतत वर्दळ असते त्यामूळे लहान वाहनधारकांना आपली वाहन अतिशय दक्षतेने चालवावी लागतात अशातच आज 14 जून 2022 ला दुपारी 1:00 वाजताच्या दरम्यान राजुरा-गडचांदूर रोड वर भीषण अपघात घडल्याची माहिती असून एका अज्ञात ट्रकने दुचाकी(स्कुटी) ला जोरदार धडक दिली असून या अपघातात दुचाकीवर असलेल्या 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वृत्त आहे मृतक मुली या हरदोना गावालगत निंबाळा या गावातील असून सूत्राच्या माहितीनुसार मृतक मुलींची नावे मेश्राम व झाडे असल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments