चंद्रपूरातील वैद्यकिय प्रतिनिधी भवन आरोग्‍य क्षेत्रातील सेवासदन ठरावे - आ. सुधीर मुनगंटीवार

 





चंद्रपूरातील वैद्यकिय प्रतिनिधी भवन आरोग्‍य क्षेत्रातील सेवासदन ठरावे - आ. सुधीर मुनगंटीवार

◾चंद्रपूरात वैद्यकिय प्रतिनिधी भवनाचा उदघाटन सोहळा संपन्‍न.


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : वैद्यकिय प्रतिनिधी हा आरोग्‍य क्षेत्रातील महत्‍वाचा घटक आहे. सर्वसामान्‍य जनतेला उत्‍तम आरोग्‍य सेवा प्रदान करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये त्‍यांचे मोलाचे योगदान आहे. महाराष्‍ट्र राज्‍य विक्री व वैद्यकिय प्रतिनिधींनी बांधलेले हे भवन आरोग्‍य सेवेच्‍या क्षेत्रातील सेवासदन ठरावे अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर शहरात महाराष्‍ट्र राज्‍य विक्री व वैद्यकिय प्रतिनिधी संघटनेच्‍या माध्‍यमातुन आयोजित वैद्यकिय प्रतिनिधी भवनाच्‍या उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय केमीस्‍ट अॅन्‍ड ड्रगीस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष जगन्‍नाथ ऊर्फ अप्‍पासाहेब शिंदे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,  माजी उपमहापौर राहूल पावडे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, माजी मनपा सदस्‍य संजय कंचर्लावार, उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार, श्रीकांत फोपसे, मुकुंद दुबे, डॉ. अमोल पोद्दार, डॉ. लक्ष्‍मीकांत सरबेरे, डॉ. भुपेंद्र लोढीया, गोपाल ऐकरे, सचिन वानखेडे, मिलींद गंपावार यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, महाराष्‍ट्रातील सर्वात उत्‍तम वैद्यकिय प्रतिनिधी भवन चंद्रपूर शहरात झाले ही अतिशय आनंदाची बाब आहे. या भवनाचे बांधकाम हे एक आव्हान होते .ते आव्हान चंद्रपुर च्या वैद्यकीय प्रतिनिधिनी नी समर्थपणे पेलले .कारणचंद्रपूर जिल्‍हा हा वाघांचा जिल्‍हा आहे. जगातील सर्वाधिक वाघ भारतात व भारतातील सर्वाधिक वाघ चंद्रपुर जिल्ह्यात आहे. वावैद्यकीय क्षेत्राशी माझा जिव्‍हाळयाचा संबंध आहे. डॉक्टर आणि केमिस्ट यांच्यातील दुवा म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी . बालपणापासूनच वैद्किय प्रतिनिधींशी माझा संबंध आला आहे. कोरोना काळात डॉक्टर , केमिस्ट यांच्यासह वैद्यकीय प्रतिनिधीनी उत्तम सेवा देत समाजासमोर आदर्श ठेवला.वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेशी असलेले माझे नाते अधिक दृढ़ करण्यावर माझा भर राहिल.वैद्यकिय प्रतिनिधींच्‍या अडीअडचणी व समस्‍या सोडविण्‍यासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून मी नेहमीच तत्‍पर राहील अशी ग्‍वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला वैद्य‍किय प्रतिनिधींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments