बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील; ( BILT ) बल्लारपूर पेपर मिल च्या बांबू डेपोला भीषण आग
◾बांबू डेपो ला दुपारी 3 वाजता आग लागली असून 5 फायर ब्रिगेड च्या गाड्या पोहोचल्या प्रयत्न सुरू आहेत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पेपर मिल ला कच्चा माल हा बांबू स्वरूपात पाहिजे असतो पूर्वी हा कच्चा माल बल्लारपूर शहरातील न्यू कॉलोनी परिसर किंवा राज्य महामार्गावर उभे राहायचे मात्र यामुळे वाहतुकीला अळथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पेपर मिल ला लागणारा कच्चा माल म्हणजे बाबू च्या साठी कळमना परिसरात बांबू डेपो निर्माण कऱण्यात येऊन या ठिकाणी बांबूची साठवणूक केली जायची मात्र आज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपो ला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे विशेष म्हणजे बल्लारपूर नगर परिषद, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपुर महानगरपालिका सह अन्य ठिकाणच्या 5 ते 6 अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.धक्कादायक बाब म्हणजे जवळचं एक पेट्रोल पंप असुन या आगीने उग्र स्वरूप धारण केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे या घटनेची माहिती कळताच तहसीलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील, कोठारी चे ठाणेदार तुषार चव्हाण हे त्यांचा पथकासह घटनास्थळी पोहोचले.पोलिस विभाग व प्रशासन घटनास्थळी पोहोचले असुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र आग इतकी भीषण आहे की ते आटोक्यात आणणे आवश्यक आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली आहे त्यामुळे आलापल्ली चंद्रपूर महामार्गावरून वाहनाचे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.







0 Comments