भीषण अपघात टिप्पर दुचाकीचा धडकेत दोन ठार; एक गंभीर जखमी
नागभीड( राज्य रिपोर्टर ) : नागभीड वरून ब्रह्मपुरीकडे जाणारा टिप्पर क्र.MH 40 BG 5441 व नागभीडजवळील चिखल परसोडीवरून नागभीडकडे येणाऱ्या दुचाकीचा क्र. MH 31 BR 1747 नागभीड रेल्वे फटकाजवळ शनिवारी,7 मे रोजी भीषण अपघात झाला.
या अपघातात चिखल परसोडी येथील बोकडे कुटुंबातील भूषण शामराव बोकडे ( 21 ), पवन बिनोद बोकडे (15 ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गिरीश सुधाकर बोकडे ( 16 ) हा गंभीर जखमी झाला आहे.
जखमीला नागभिड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ब्रह्मपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. मृतक भूषण बोकडे हा नागभीड येथील किराणा दुकानात काम करत होता. शनिवारी सायंकाळी घरी चुलत भावांचे लग्न असल्याने तो दुकानात आला नव्हता. मात्र आपल्या चुलत भवांडासोबत काही कामानिमित्त नागभीड येथे दुचाकीने येत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्हीची जागीच मृत्यू झाला. दोघांचाही मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी आणले आहेत.
मृतक आणि जखमी हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, आई-वडील हे मजुरीचे काम करतात. मृतक भूषण बोकडे याला आई, वडील, एक भाऊ व एक बहीण आहे. तर पवन बोकडे याला आई-वडील व एक बहीण आहे. या घटनेने बोकडे कुटुंबावर आणि गाववासियांवर फार मोठे दुःख कोसळले आहे. दरम्यान, शनिवारी गावात असलेले सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच स्वागत समारंभाचा कार्यक्रम संदोकर कुटुंबाने रद्द केलेला आहे. या घटनेचा तपास नागभिड पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजू मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






0 Comments