चंद्रपूरात घरफोड्या गुन्हा उघडकीस रामनगर पोलिस ; एक आरोपी अटक




चंद्रपूरात घरफोड्या गुन्हा उघडकीस रामनगर पोलिस ; एक आरोपी अटक 

◾1,10,100/- रु चा मुद्देमाल जप्त 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक 5 /5 / 2022 रोजी फिर्यादी नामे सौ. निभा रवींद्रनाथ राय वय 58 वर्ष रा.प्रगती नगर निवासी  चंद्रपूर यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की दिनांक. 4 /5 /2022 रोजी सकाळी पाच वाजता दरम्यान फिर्यादी पती रवींद्रनाथ राय असे मिळून मुलगी नामे अनुश्री राय भेटण्याकरिता राहणारा वडसा जिल्हा गडचिरोली येथे गेले असताना फिर्यादीचे घरी राहणारे किरयादार यांनी फिर्यादीचे पती यास फोन करून तुमचे घरचे ताला टूटलेला आहे. असे सांगितले वरून फिर्यादी वा पती असे वडसा येथून घरी परत आले येऊन पाहिले असता घराचे अलमारी मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 1 लाख 40 हजार रुपये माला कोणीतरी आज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर अपराधी क्रमांक 442 /2022 कलम 454,457,380, भदवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

नामुद  गुन्ह्याचे गांभीर्य बघता  मा. पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनी हर्षल अॆकरे,पोउपनि विनोद भुरले व डी. बी. स्टाफ असे गुन्ह्याचे घटनास्थळी तात्काळ  भेट देऊन गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवून घटनास्थळी आजूबाजूचे  माहिती तसेच गोपनि य बातमीदाराचे माहिती वरून आरोपी आशिष उर्फ अशु श्रीनिवास रेड्डीमला ( 22 ) वर्ष, रा. डिफेन्ससरी चौक, रयतवारी कोलरी चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यावरून नमूद आरोपीकडून खालील प्रमाणे सोन्याचे दागिने जप्त केले.

एक सोन्याची अंगुठी वजन अंदाजे तीन ग्राम किंमत 7,500/-  रु, दोन जोड सोन्याचे कानातील झुमके एकूण वजन सहा ग्राम 15,000/- रु, एक जोडी सोन्याचे कानातील टॉप्स एकूण वजन 4gram किंमत 10,000/- रु, एक सोन्याचे चैन भजन पाच ग्राम किंमत 12,500/- रु, एक लोखंडी सडाख एक  बाजूची  चापट असलेली किंमत 100/- रु, असा एकूण 1,10,100/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे चंद्रपूर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक  श्री. राजेश मुळे, सपोनि हर्षल अॆकरे,पोउपनि  विनोद भुरले, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार,पोहवा/09 पेतरस सिडाम,पोहवा/1974 मरकोल्हे,नापोशि/1229 विनोद यादव,नापोशि/1176 किशारे वैरागडे,नापोशि/2182 चिकाटे,नापोशि/1165 आनंद खरात,नापोशि/917 निलेश मुडे,नापोशि/2513 पांडुरंग वाघमोडे,नापोशि/सतिश अवथरे,नापोशी/2430 लालु यादव,पोशि/2513 विकास जुमनाके,पोशि/हिरालाल गुप्ता, पोशि/881 संदिप कामडी,पोशि/सुरजीत शेंडे,मनापोशि/भावना रामटेके यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments