मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मिळणार मदत, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती मुख्यमंत्री यांना मागणी
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मुल मार्गावरील अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटुन केली होती. यावेळी मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. यावर २४ तासाच्या आत मुख्यमंत्री यांनी निर्णय घेत मृतकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन पाच लक्ष रुपयांची मदत जाहिर केली आहे.
गुरुवार रात्रोच्या सुमारास लाकडणाने भरलेला ट्रकची डिझेल टँकरशी समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहणांनी पेट घेतला हि आग इतकी भीषण होती की यात ट्रक मधील सहा कामगार, वाहणचालक आणि डिझेल टँकर मधील वाहण चालक व मजूर यांचा जळुन मृत्यु झाला होता. घरचा कर्ता गमावल्याने सदर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले होते. त्यामूळे सदर कुटंबांचा सहानभुती पुर्वक विचार करुन त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुबंई येथील वर्षा निवासस्थावर भेट घेऊन केली होती. या मागणीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २४ तासाच्या आत दखल घेत सदर मृतक कुटुंबियांना 5 लक्ष रुपयांची मदत जाहिर केली आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहे. आपल्या मागणीनुसार सदर मदतीची घोषणा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ई-मेलच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांना कळविण्यात आले आहे. यानंतर अमादार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले असून सदर पत्रातून त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहे. सदर कुटुंबियांचा सहानभूतीपूर्वक विचार करून आपण जाहीर केलेली मद्दत या कुटुंबियांना मोठा आधार देणारी असल्याचे सदर पत्रातून आमदार किशोर यांनी म्हटले आहे.






0 Comments