आमदार किशोर जोरगेवार यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : रमजान ईद निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी लष्करे ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे जाऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी येथील मुक्ती वलीउल्लाह साहाब आणि हाफीस साहाब यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, युथ अध्यक्ष राशेद हुसेन, अबरार सय्यद, इमरान शेख, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता यांच्यासह मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली चंद्रपूरमध्ये सुद्धा ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील लष्करे ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे उपस्थिती दर्शवत दहगाहमध्ये येणा-या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी लष्करे दरगाह येथील मुक्ती वलीउल्लाह साहाब आणि गुप्त मस्जिद येथील हाफीस साहाब यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल श्रिफळ देऊन सत्कार केला.







0 Comments