अहीर गवळी समाजाच्या १० व ११ व्या सामूहिक विवाह सोहळा

 





अहीर गवळी समाजाच्या १० व ११ व्या सामूहिक विवाह सोहळा 

◾पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जालना ( राज्य रिपोर्टर ) : जालना येथे आयोजित अहीर गवळी समाजाच्या १० व ११ व्या सामूहिक विवाह सोहळा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर व  गवळी समाजाच्या महाराष्ट्र, जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 यावेळी त्यांनी नवपरिणीत दाम्पत्यास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम समाजातील नेतेमंडळी व प्रतिष्ठित नागरिक राबवित असल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. 

या सामूहिक विवाह सोहळ्यात ४२ जोडपे विवाहबद्ध झाले. याप्रसंगी अनेक जिल्ह्यातील विविध पक्षातील नेतेमंडळी तसेच विवीध समाजातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यास हजारोच्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments