बिबट्याची हल्यात महिला जागीच ठार दहशत कायम
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर येथे स्वतःच्या घरासमोरील अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले .
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की दुर्गापूर वार्ड क्रमांक. 3 येथील गीता मेश्रम 45 महिला काल रविवारी रात्रीचे जेवण आटोपून अंगणात बसली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर वार्ड क्रमांक. 3 परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला. आणि सदर महिलेवर हल्ला केला. महिलेने यावेळी जोरजोरात आरडा-ओरडा केल्याने घरातील कुटुंबिय धावत बाहेर आले. आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र गीता मेश्राम गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दुर्गापुर मागील काही महिन्यापासून ऊर्जानगर व दुर्गापूर भागात वन प्राण्याची धुमाकुळ घातल्याने नागरिक दहशतीत जीवन जगत आहे. काही दिवसापूर्वी याच परिसरात बिबट्याने एका छोट्या मुलास आणि घराशेजारी उभा असलेल्या तरुणाला उचलून नेले होते. आतापर्यंत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




0 Comments