पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी बाबत मोठा निर्णय : ई-केवायसी करण्यासाठी ३१ मे पर्यत मुदतवाढ !

 



पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी बाबत मोठा निर्णय : ई-केवायसी करण्यासाठी ३१ मे पर्यत मुदतवाढ !

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजना म्हणजे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १० हप्ते मिळाले असून, येत्या एप्रिलमध्ये योजनेचा ११ वा हप्ता मिळणार आहे..

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली होती.. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांत काही बदल केले आहे. सरकारने शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी ‘ई-केवायसी’ करण्याची सूचना केली होती. ‘ई-केवायसी’ न करणाऱ्या शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करताना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन करता येत असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी प्रत्यक्ष ‘सीएससी’ केंद्रावरच ही प्रक्रिया करीत आहेत. या केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. ई-केवायसीसाठी मुदतवाढ ‘ई-केवायसी’साठी या सेंटरवर शेतकऱ्यांना तास न् तास बसावे लागते. कधी वेबसाईट जाम होते, तर कधी बंद पडते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने ‘केवायसी’ प्रक्रियेत अडचणी येत आहेत. सातत्याने या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत ‘ई-केवायसी’ करणं शक्य नव्हतं. त्यामुळे या प्रक्रियेसासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेऊन मोदी सरकारने या योजनेच्या ‘ई-केवायसी’साठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. शेतकऱ्यांना www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर ‘ई-केवायसी’ करता येईल. ही वेबसाइट ओपन करा. त्यावर तुम्हाला लाल अक्षरांत ‘पीएम किसान योजनेसाठी ‘केवायसी’ करणे बंधनकारक’ असल्याची सूचना दिसेल.

‘केवायसी’साठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे फोन नंबर व आधार कार्डला लिंक असल्यास तुम्ही आधार नंबरच्या साहाय्याने ‘केवायसी’ करू शकता.

संकेतस्थळावर त्यासाठी ‘फार्मर कॉर्नर’वर क्लिक करा. नंतर ‘आधार केवायसी’ नावाचे पेज समोर येईल. त्यात सुरुवातीला आधार क्रमांक, नंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे व अंक, जसेच्या तशी टाकायची आहेत. नंतर ‘search’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर आधार नंबर दिसेल, त्यानंतर आधार कार्डला लिंक असणाराच मोबाईल नंबर टाकावा. नंतर ‘Get Otp’वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी भरुन ‘submit for Auth’वर क्लिक केले, की तुमचे ई-केवायसी पूर्ण होणार आहे.

ई-केवायसी अयशस्वी झाल्यास किंवा ‘invalid’ पर्याय आल्यास ‘सीएससी’ केंद्रावर जावे. आधार कार्ड जर मोबाईल नंबरला लिंक केलेला नसेल, तर ‘सीएससी’ केंद्रावर कागदपत्रे देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Post a Comment

0 Comments