धक्कादायक घटना : पतीने पत्नीला डिजल टाकून जिवंत पेटविले महिलेचा मृत्यू


धक्कादायक घटना :  पतीने पत्नीला डिजल टाकून जिवंत  पेटविले  महिलेचा मृत्यू

◾चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील सुशी येथील घटना

मूल ( राज्य रिपोर्टर ) : नेहमीच पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादाचे रूपांतर अखेर पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना मूल तालुक्यातील सुशी या गावात घडली असून उपचारा दरम्यान पत्नीचे मृत्यू झाला आहे. सुशी या गावात ६८ वर्षीय गंगाराम शेंडे आणि ६५ वर्षीय मुक्ताबाई शेंडे हे राहत होते. या दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होते. गंगाराम याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी मुक्ताबाई वर संशय घेऊन वाद घालत होता. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात गंगाराम ने मोटार पंप करिता आणलेल्या डिझेल पत्नी च्या अंगावर ओतून माचिस ने आग लावली. मुक्ताबाई ने आरडा ओरडा केले असता शेजारी धावत येऊन आज विझविली आणि मुक्ताबाई ला मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु जळल्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिला नागपूर येते नेत असताना वरोरा जवळ तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुक्ताबाई च्या मृतदेहाचे मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. मूल पोलिसांनी आरोपी गंगाराम शिंदे याला अटक केली असून मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड पुढील तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments