बल्लारपूर शहरात पार पडला भिमा-कोरेगाव विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळा : भिक्षुसंघासह मान्यवरांची उपस्थिती

 





बल्लारपूर शहरात पार पडला भिमा-कोरेगाव विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळा : भिक्षुसंघासह मान्यवरांची उपस्थिती


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : १ जानेवारी १८१८ ला पुणे जिल्ह्यातील भिमा नदीच्या तिरावर ५०० महार शूर सैनिकांनी २८००० पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव केला या शोर्य दिनाच्या २०४ व्या विजय दिनानिमित्त बल्लारपूर शहरात जेबीबीएस विदर्भ या संघटनेच्या वतीने मागील ४ महिन्यापासून बल्लारपूर शहरातील जयभीम चौक परिसरात विजयस्तंभ निर्मितीचे कार्य सुरू होते ते पूर्णत्वास आले विशेष म्हणजे बल्लारपूर येथील विजय स्तंभ ३५ फूट उंचीचा असून यांच्या पायाभरणी साठी भिमा-कोरेगाव च्या पवित्रभूमीतून माती आणली होती.या विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळा आज १ जानेवारी २०२२ ला पार पडला प्रारंभी सकाळी ८:०० वा. बल्लारपूर शहरातील मध्यवर्ती स्मारक असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भिक्षु संघ व समता सैनिक दल व अनुयायांची पदयात्रा कार्यक्रम स्थळ जयभीम चौक परिसरात आली. सकाळी १० वा या विजयस्तंभाचा लोकार्पण सोहळा पु.भदंत ज्ञानज्योती महास्थविर व भिक्षु संघ तसेच १९७१ च्या भारत-पाक युद्धातील महार रेजिमेंट चे सैनिक कचरूजी साळवे यांच्या हस्ते लोकार्पण झाले तदनंतर राष्ट्रगीत झाले शिवाय समता सैनिक दल, पंचशील व्यायाम शाळेच्या वतीने सलामी देण्यात आली.

          दुपारी १२ वाजता भिक्षु संघाचे प्रवचनात मार्गदर्शन करतांना पु.भदंत ज्ञानज्योती महास्थवीर म्हणालेत की, " पुरातन काळा पासून अस्तित्वाची लढाई सुरू आहे मग ती भगवान बुध्द पासून, सम्राट अशोक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यंत चा लढा सुरू च आहे. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने विषमतेविरुध्द चा लढा लढला. महार सैनिकांच्या शोर्यमुळे प्रभावित होऊन बाबासाहेब १ जानेवारी १९२७ पासून दरवर्षी न चुकता भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करायला जात असत." 

          तदनंतर दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान प्रा.दिलीप चौधरी, प्रा.जावेद पाशा, डॉ.अभिलाषा गावतुरे यांचे विविध विषयांवर व्याख्यान पार पडले यावेळी महार रेजिमेंट च्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान झाकीर काजी यांचा बहारदार कव्वाली चा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आयु.नरेश गेडाम व छावा संघटना राजुरा, यांच्या माध्यमातून अविरत भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली तसेच पोलीस प्रशासन, अग्निशमन विभाग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सदर कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी संतोष बेताल ( अध्यक्ष ), एड.पवन मेश्राम( कार्याध्यक्ष ), देशपाल मुन ( महासचिव ), देविदास करमनकर ( सल्लागार ), अविनाश लोखंडे ( Architecture ), संतोष मेकलवार व JBBS चे  विदर्भ चे महिला व पुरुष  पदाधिकारी व सदस्यगण ई चे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments