बल्लारपूरात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 



बल्लारपूरात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा  

◾विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : ६ जानेवारी पत्रकार दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या शाखा बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार दिनानिमित्त कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले तत्पूर्वी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रजवलीत करण्यात आले तसच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला राष्ट्रीय स्तरावरील कवी ज्यांनी एका वर्षात ९२ पेक्षा अधिक पुरस्कार जिंकले असे कवी बाबू भंडारी, आज तक न्युज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी विकास राजूरकर, बल्लारपूरातील पत्रकार व कामगार नेते श्री अजय दुबे, ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास उन्नाव, नगरसेवक सिक्की यादव, नवभारत वृत्तपत्राचे उपसंपादक(चंद्रपूर) श्री सुरेश वर्मा, झी मीडिया चे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आशिष अंबाडे, डॉ.अनिल वाढई, निर्भय ट्रान्सपोर्टचे संचालक तेजिंदरसिंग दारी, परिष मेश्राम ई चा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

        बल्लारपूर येथील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं उदघाटन मा. विजय सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष अंबाडे, तर विशेष उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.विजय सोरते, डॉ.प्रशांत राऊत, सुरेश रामगुंडे, पद्माकर पांढरे गुरुजी, प्रशांत विघ्नेश्वर ई ची मंचावर उपस्थिती होती. महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, अनिल पांडे, मंगेश बेले, मंगेश रेगुंडवार, गणेश रहिकवार, नरेंद्र सोनारकर, मनोहर दोतपल्ली, प्रशांत वैरागडे, सुजय वाघमारे, प्रा.योगेश खेडेकर, दिपक भगत, राजेश खेडेकर, मुन्ना खेडकर ई पत्रकार बांधवाची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रमेश निषाद, उपाध्यक्ष विकास राजूरकर, सचिव अजय रासेकर, परिष मेश्राम, विवेक गडकर, प्रशांत भोरे, अनेकेश्वर मेश्राम, ज्ञानेन्द्र आर्य, सुभाष भटवलकर, वैभव मेश्राम, देवेंद्र झाडे ई चे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचं संचालन घनश्याम बुरडकर तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.



Post a Comment

0 Comments