भीषण अपघात : ४ महिला ठार तर ५ गंभीर जखमी

  


भीषण अपघात : ४ महिला ठार तर ५ गंभीर जखमी

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर )  : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो पीकअप व्हॅन चा भीषण अपघात झाला असल्याचे वृत्त आहे. चालकाचे वाहणावरून नियंत्रण सुटल्यामुळे वाहन झाडावर जाऊन आदळले सदर घटना आज पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान घडल्याचे वृत्त असून या भीषण अपघातात ४ महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. सूत्राच्या माहितीनुसार मनीषा सलामे, मंजुळा उईके, कलाबाई परतेती, मंजुला धुर्वे, यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ५ महिला मजूर या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

        आज २ जानेवारीला पहाटेच्या सुमारास काटोल तालुक्यातील ईसापूर-घुमडपेठ या रस्त्यावर भीषण अपघात घडल्याचे वृत्त आहे.या परिसरात सद्या संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअप वाहनाने कामासाठी जात होत्या दरम्यानच्या काळात वाहन चालकाचे वाहणावरून नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळले या भीषण अपघातात तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका महिलेचा रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला तर ५ महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सदर घटनांची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments