ब्रम्हपुरी येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी

 



ब्रम्हपुरी येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी

ब्रम्हपुरी ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारीतेची मुहुर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज दि. ६ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथे पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.रा.मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर हे होते. याप्रसंगी म.रा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ रवी रणदिवे, कार्याध्यक्ष प्रा. संजय लांबे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल मैंद, पत्रकार संघाचे सचिव नंदु गुड्डेवार, ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, पोलिस अंमलदार राहुल लाखे, मधुकर मेश्राम, चंद्रशेखर सातव, अमरदीप लोखंडे, प्रशांत राऊत, तुलेश्वरी बालपांडे, राहुल भोयर, महेश पिलारे, संतोष पिलारे, भाऊराव खापर्डे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर यांनी पत्रकारीतेबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल मैंद यांनी केले. तर आभार सचिव नंदु गुड्डेवार यांनी मानले.


Post a Comment

0 Comments