बल्लारपूर-बामणी मार्गावरील महराजा बियर-बार जवळ स्विफ्ट-सुमोचा भीषण अपघात :१ गंभीर जखमी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज बल्लारपूर शहर नववर्षाचे स्वागत करीत असतांना व सगळीकडे आनंदित वातावरण असतांना मात्र बल्लारपूर-बामणी मार्गावरील महराजा बियर-बार जवळ सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास बल्लारपूर कडून बामणी ला जात असलेल्या स्विफ्ट गाडीने सुमो गाडीला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघाताने सुमो ही रस्ता दुभाजकावर चढली या सुमोतील ५ ही प्रवासी अपघातातुन सुदैवाने वाचले मात्र या अपघातात स्वीफ्ट गाडीचा चालक बचावला तो जखमी असल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहिती नुसार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात घडताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून वाहतुकीवर नियंत्रण राखण्यात आले आहे.


0 Comments