बल्लारपुर शहरात चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा द्वारा विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

 


बल्लारपुर शहरात चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा द्वारा विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

◾लवकरच वेगवेगळ्या विकास कामामुळे उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन होणार.नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद - हरीश शर्मा

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात झाकीर हुसैन वार्डात विविध ठिकाणे भूमिगत नालीच्या बांधकामाचे तसेच झोन 1, झोन 2 व झोन 4 मधील उखडलेल्या रस्त्यांच्या रिस्टोरेशन च्या कामांचे भूमिपूजन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. चंदनभैय्या चंदेल यांच्या हस्ते व मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले की माननीय माजी अर्थ नियोजन व वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपुर शहराचा सर्वांगीन  विकास करण्याकरिता अगन्य निधी उपलब्ध करुण देत चेहरा-मोहरा बदलविला परंतु नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे  बांधण्यात आलेले रस्ते उखडले गेले.शासनाने उखडलेल्या रस्त्यांच्या रिस्टोरेशन करिता निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती परंतु आजपर्यंत ती निधी उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या निधीअंतर्गत रिस्टोरेशन चे काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

 लवकरचं बल्लारपूर शहरातील सर्व उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलेल्या शब्द पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष सौ.मीनाताई चौधरी, नगरसेवक सौ.आशा संगीडवार,सौ सुवर्णा भटारकर, सौ. सारिका कणकम,सौ. मीनाताई बहुरिया श्री.सागर राऊत तसेच श्री.काशी नाथ सिंह,श्री. अरुण भटारकर,श्री.सतीश कनकम,श्री.देवेंद्र वाटकर,श्री. राजू बहरिया,श्री.घनश्याम बुरडकर,श्री.गगन ओहरी, श्री.देविदास उमरे ,श्री.शंकर तोकल,लक्ष्मण पोहाने,सचिन उमरे व वार्डातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments