दलित विकास सुधार योजना निधी अंतर्गत बल्लारपूर शहरातील डॉ. आंबेडकर वार्डात व विविध दोन स्थानांवर हायमास्ट लाईटचे लोकार्पण

 


दलित विकास सुधार योजना निधी अंतर्गत बल्लारपूर शहरातील डॉ. आंबेडकर वार्डात व विविध दोन स्थानांवर हायमास्ट लाईटचे लोकार्पण

◾बल्लारपुर शहराचा चौफेर विकास करित जनतेची सेवा करतांना  मिळत असलेला आनंद हा अद्वितीय - हरीश शर्मा नगराध्यक्ष


 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहरात रस्ते,भुमिगत नाली,पाथवे,ग्रिन जिम,सार्वजनीक स्थळांचे व चौकांचे सौदर्यीकरण, बगीचे,एलईडी स्ट्रीट लाईट अश्या अनेक विकास कामातुन बल्लारपुर शहर हे सुंदर शहरात गणले जात आहे.त्याच विकास कामाचा भाग आज डॉ. आंबेडकर वार्डातील व दोन विविध स्थानांवर हायमास्ट लाईट लावण्यात आले.

ज्यामुळे या प्रमुख स्थळातील परिसर रोशनायीने जगमगत आहे.या हायमास्ट लाईट चे लोकार्पण मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी श्री. काशीनाथ सिंह, नगर सेविका सौ. सारिका कनकम तसेच श्री.मेघनाथ सिंह,सतिश कनकम ,सचीन उमरे व मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments