पु.भदंत कृपाशरण महास्थविर यांच्यावर भिक्षुसंघ व हजारो बौध्द बांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : अखिल भारतीय भिक्षु संघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक, व भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक पु.भदंत कृपाशरण महास्थविर यांचे काल ११ डिसेंम्बरला सायंकाळी ६:४० मिनिटांनी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते आज १२ डिसेंम्बरला तक्षशिला बुध्द विहार, विकास नगर बाबूपेठ, चंद्रपूर येथून पु.भदंत कृपाशरण महास्थवीर यांच्या अंत्ययात्रेस दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान सुरुवात झाली तत्पूर्वी पु.भदंत कृपाशरण महास्थविर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती, ब्रिजभूषण पाझारे, प्रा.रवी कांबळे, आंबेडकरी विचारवंत डॉ.सुधाकर पाझारे, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक स्नेहल रामटेके, माजी नगरसेविका लता साव ई नी घेतले तदनंतर पु.भदंत सुमनवन्नो महास्थविर यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्षु संघ व हजारो बौध्द उपासक-उपासीकेच्या उपस्थितीत अंत्ययात्रेस सुरुवात झाली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह परिसरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा व बल्लारपूर नगर परिषद परिसरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भिक्षु संघाने अभिवादन करून अंत्ययात्रा राजुरा येथील वर्धा नदीच्या प्रज्ञा घाट पोहोचली व सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान भिक्षु संघ व हजारो बौध्द बांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.


0 Comments