करोडोची संपत्तीची गेली कवडीमोल किंमतीत बल्लारपूर येथील खणके निवास सील

 




करोडोची संपत्तीची गेली कवडीमोल किंमतीत बल्लारपूर येथील खणके निवास सील

◾अंबिका टिम्बर फर्म च्या नावाने ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते 

◾खनके परिवाराची अंदाजित किंमत ३ करोड रुपये असलेली ३ मजलीची इमारत फक्त ५० लाख रुपयात 

◾४ कुटुंबियांना ऐन हिवाळ्याच्या दिवसात बेघर

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील रेल्वे वॉर्ड येथील रेल्वे चौक परिसरातील खनके परिवारातील चंद्रकांत खनके यांनी मागील १५ वर्षांपूर्वी शिक्षक सहकारी बँक शाखा बल्लारपूर येथून अंबिका टिम्बर फर्म च्या नावाने ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र आपल्या व्यवसायात झालेला तोटा व बँकेच्या कर्जापाई त्रासून २००९ मध्ये चंद्रकांत खनके यांनी बल्लारपूर येथील वनविभागाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती २०१८-१९ मध्ये बँकेचे जवळपास ७० लाखाचे कर्ज भरल्याची माहिती आहे याशिवाय राज्य महामार्गालगत असलेली चार एकड शेती, दोन प्लॉट विकुनही कर्ज फेडण्यात आले शिक्षक सहकारी बँकेने खनके परिवारांची जवळपास राज्यमहामार्गालगत असलेली ७ करोड रुपयांची मालमत्ता विकून आपलं कर्ज जरी वसूल केलं असलं तरी अजूनही बँकेचे या परिवारावर करोडो रुपयांचं कर्ज असल्याची माहिती आहे. खनके परिवाराची अंदाजित किंमत ३ करोड रुपये असलेली ३ मजलीची इमारत फक्त ५० लाख रुपयात विना निविदा प्रकाशित करून कुटुंबियांची परवानगी न घेता निलाम करण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात सुरेश खनके यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता मात्र ४ महिन्यांपूर्वी सुरेश खनके यांच्या निधनानंतर बँकेने कोर्टाची याचिका खारीज झाल्यानंतर आज जप्ती पथकाच्या माध्यमातून या इमारतीवर कारवाई करण्यात आली व या इमारतीला सील करण्यात आले. या जप्ती पथकात बँकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी होते विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार बँकेकडून घेण्यात आलेल्या या इमारतीला या बँकेतीलच काहीनी २ करोड रुपयात परस्पर विकल्याची माहिती आहे मात्र सदर कारवाई मुळे या इमारतीत राहणाऱ्या ४ कुटुंबियांना ऐन हिवाळ्याच्या दिवसात बेघर व्हावे लागेल की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments