चंद्रपूर वरून बल्लारपूर ला येत असलेल्या अनियंत्रित कारचा अपघातात : २ ठार तर २ व्यक्ती गंभीर झाल्याचे वृत्त

 


चंद्रपूर वरून बल्लारपूर ला येत असलेल्या अनियंत्रित कारचा अपघातात : २ ठार तर २ व्यक्ती गंभीर झाल्याचे वृत्त

◾बाबूपेठ उड्डाणपुलावर अनियंत्रित कारचा अपघात 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी लगतच्या बाबूपेठ उड्डाणपुलावर आज सायंकाळी ५:१५ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून बल्लारपूर ला येत असलेल्या अनियंत्रित कारचा अपघात घडला आहे. सूत्राच्या माहितीनुसार MH 34 BR 0141 क्रमांकाची कार  बल्लारपूर निवासी असलेल्या वसंत दुर्गेय्या तोगरवार यांची असल्याची माहिती आहे सदर कारने चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असतांना कार अनियंत्रित झाल्यामुळे बाबूपेठ उड्डाणपुलावरून खाली पडली या कारमध्ये अभिषेक गुप्ता, मोहन रेड्डी, रोहित नागलवार, चिंटू तोगरवार हे ४ व्यक्ती प्रवास करीत होते त्यामुळे झालेल्या अपघातात १ व्यक्ती घटनास्थळी ठार तर दुसरा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर २ व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे विशेष म्हणजे सदर अपघातात जखमी असलेले ४ ही व्यक्ती बल्लारपूर निवासीं असून या अपघातातील एका मृतकाचे अभिषेक गुप्ता असून दुसऱ्याचे नाव अजून कळू शकले नाही अपघात घडताच घटनास्थळी बघ्यांची  गर्दी उसळली असून चंद्रपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे व पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.प्राथमिक माहितीनुसार सदर कार बल्लारपूर येथील असल्याचे वृत्त आहे.



Post a Comment

0 Comments