चंद्रपूर एमआयडीसी परिसरात मार्गावर रस्ता अपघातात २ तरुणांचा अपघाती मृत्यू
◾भाचीच्या लग्नकार्यात देव पोहोचविण्यासाठी गेले मात्र परत येताना कायमचे देवाघरी गेले !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : वणी ते चंद्रपूर मार्गाने दुचाकीने दोघे मित्र विसापूर कडे येत होते. दरम्यान चंद्रपूर एमआयडीसी दुचाकी आणि बोलेरो वाहणात जबर धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती की अपघातात विसापूर येथील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार ( ता.२२ ) सायंकाळी ७.३० वाजता घडली. यामध्ये सुधाकर लक्ष्मण धोटे ( वय ४८ ) व मनोज गणपती जुनघरे ( वय ४७ ) रा. विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर अश्या दोन तरुणांचे या दुचाकी अपघातात मृत्यू झाली आहेत. अपघातातील दोन्ही तरुण दोन्ही सख्खे जिवलग मित्र आणि जोडीदार होते. दोन्ही तरूनांची अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. घटनेच्या दिवशी मनोज जुनघरे आणि सुधाकर धोटे हे दोघे जिवलग मित्र MH 34 - BQ 0413 या दुचाकी ने वणी जि. यवतमाळ येथे भाचीच्या लग्न कार्यानिमित्य देव पोहचविण्यासाठी गेले होते. ते पोहचते करून निरोप घेत घुग्घुस मार्गाने विसापूर कडे येत असताना एमआयडीसी परिसरात एका वळणावर बोलेरो वाहन क्रमांक MH 34 - M 2544 ने दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातातील धडक इतकी भीषण होती. या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर धोटे जागीच ठार झाले. तर सहकारी मित्र मनोज जुनघरे यांचा उपचारा दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या दोन्ही तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे विसापूरात शोकळका पसरली आहे.
मनोज जुनघरे यांच्या भाचीचे २६ डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. यनिमित मनोज हा मित्र सुधाकर धोटे सोबत देव बहिणीच्या घरी वणी येथे पोहचविण्यासाठी मित्र सुधाकर यांना घेऊन गेला होता. याच दरम्यान गावाकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला एका बोलेरो वाहनाने मल्टी ऑरगॅनिक कपंनीजवळ जबरदस्त धडक दिली. या धडकेत सुधाकर धोटे याचा जागीच ठार तर मनोज जूनघरे यांचा उपचाादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही तरुण बल्लारपूर पेपर मिल येथील कार्यरत आहेत. घटनेतील सुधाकर धोटे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. मनोज जुनघरे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहेत. विसापूर येथील स्म्शानभूमीवर आज दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. या दोन्ही तरुणाच्या अपघाती निधनाने विसापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहेत.


0 Comments