पाच नगर परिषदेवर प्रशासक बसणार चंद्रपूर जिल्ह्यात नगर विकास मंत्रालयाचे आदेश !

 


 


पाच नगर परिषदेवर प्रशासक बसणार चंद्रपूर जिल्ह्यात नगर विकास मंत्रालयाचे आदेश !

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्रात डिसेंम्बर अखेर पर्यंत मुदत संपत असलेल्या नगर परिषदावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास मंत्रालयाने जारी केले आहेत. राज्यात वाढत असलेल्या ओमायक्रोन( कोरोना ) रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जानेवारी-फरवरीत अपेक्षित असलेल्या निवडणुका एप्रिल-मे २०२२ ला होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच नगर परिषदावर प्रशासक नियुक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रिया होण्यास अडचण निर्माण होत असल्याने या नगरसेवकांवर प्रशासक नियुक्त करण्याबाबतचे आदेश निघाले आहेत. याविषयीच्या अधिक माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही नगरपंचायत २६ डिसेंम्बर, वरोरा नगर परिषद ३० डिसेंम्बर, मूल नगर परिषद ३० डिसेंम्बर, राजुरा नगर परिषद ३१ डिसेंम्बर तर बल्लारपूर नगर परिषद १ जानेवारी २०२२ ला मुदत संपत आहे. त्यामुळे कार्यकाळ संपत असल्याचा तारखेपासून संबंधित उपविभागीय अधिकारी/मुख्याअधिकारी संबंधित नगर परिषदेचा प्रशासक म्हणून कार्य पार पडणार आहेत. यापूर्वीच मुदत संपत असलेल्या काही ठिकाणी निवडणुका देखील घेण्यात आल्या मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काही ठिकाणी त्या जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहेत.

Post a Comment

0 Comments