डिजीटल शाळेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणात आमूलाग्र बदल होईल - आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार
◾बल्लारपूरात महात्मा गांधी शाळा डिजीटल शाळा व व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहर चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून या शहराने कायमस्वरूपी माझ्यावर मतदान स्वरूपात प्रेम व्यक्त करून मला सेवा करण्याची संधी दिली मतदाराच्या प्रेमामुळेच मी अनेक पद भूषविली इतकेच नव्हे तर राज्याच अर्थमंत्री पद सुध्दा बल्लारपूर वासीयांच्या मतदाररूपी प्रेमातून प्राप्त केले त्यामुळे बल्लारपूर वासीयांचे उपकार मी कधीही विसरणार नाही आज बल्लारपूर शहरात मुलींच्या डिजीटल शाळा व अत्याधुनिक व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा पार पाडताना मला अत्यानंद होत आहे राज्यात पहिली मुलींची डिजीटल शाळा सुरू होण्याच्या मान माझ्या मतदार संघात व प्रामुख्याने बल्लारपूर शहरात होत असल्याचा मला अभिमान आहे. सदर मत महाराष्ट्राचे माजी वित्त,वन व नियोजन मंत्री आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील महात्मा गांधी शाळा, डिजीटल मुलींची शाळा, व व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले.
बल्लारपूर शहरात आज जुने बसस्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधी/राजेंद्र प्रसाद शाळेच्या ठिकाणी आधुनिक स्वरूपात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी शाळा, मुलींची डिजीटल शाळा, व व्यायाम शाळा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार, माजी आमदार जेनुद्दीन जव्हेरी, मा.चंदनसिह चंदेल, हरीश शर्मा, नगराध्यक्ष, सौ.मिनाताई चौधरी,उपाध्यक्ष, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक ई मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात पुष्प अर्पण व दिपप्रजवलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक हरीश शर्मा, नगराध्यक्ष बल्लारपूर बोलतांना म्हणाले की, जानेवारी २०१६ पासून आम्ही बल्लारपूर जनतेची अविरत सेवा करण्याचा प्रयत्न केला यावेळी कोणताही पक्षभेद न करता सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या २७ डिसेंम्बरला आमचा कार्यकाळ संपन्न होत असतांना मागील ५ वर्षात बल्लारपूर शहराचा विविध माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला मग ते प्रशस्त उपविभागीय कार्यालय असो, पोलीस स्टेशनची इमारत, विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात आलेले बसस्थानक, बॉटनिकल गार्डन, बल्लारपूर शहरातील अनेक प्रभागात तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते अशी अनेक विकास कामे करण्यात आली आहे असे मत व्यक्त केले यावेळी बल्लारपूर शहरात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा च्या पारितोषिक वितरण पार पडले तसेच महात्मा गांधी शाळेत जुन्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा पार पडला विशेष म्हणजे गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून मा.चंदनसिह चंदेल, लखनसिह चंदेल, रामधन सोमाणी, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, मंगल जीवने, मोहन गुप्ता यांच्यासह २१ विविध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष हरीश शर्मा यांचा तिरंगा राष्ट्रध्वज देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं संचालन शब्बीर अली तर आभार प्रदर्शन जयवंत काटकर उपमुख्याधिकारी बल्लारपूर यांनी केले.


0 Comments