ओडिशा राज्यातून आलेल्या हत्तीचा कळप चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील घुसल्याचा अंदाज ?

  


ओडिशा राज्यातून  आलेल्या हत्तीचा कळप चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील घुसल्याचा अंदाज ? 

◾हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : अंदाजे ८०० किलोमीटरचं अंतर पार करत हत्तींचा एक कळप चंद्रपुरात पोहोचला असल्याचा दावा केला जात आहे. हा कळप ओडिशातून आला असल्याचं सांगितलं जातं आहे, मात्र या वृत्ताला वनअधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. छत्तीसगड, गडचिरोली मार्गे हा कळप चंद्रपुरात पोहोचला असल्याचं सांगण्यात येत आहे. ओडिशा ते चंद्रपूर हे अंतर अंदाजे ८०० किलोमीटर इतके असल्याने आहे. इतकं मोठं अंतर पार करून हत्तींचा कळप चंद्रपुरात येण्याची ही बहुधा पहिली घटना आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज गावातील लोकांना हा कळप पहिल्यांदा दिसला होता. शेतामधील मंडळींनी हत्ती आल्याचे पाहिले होते आणि त्यांनी ही बाब गावातील इतरांनाही कळवली होती. हत्ती आल्याचे कळताच त्यांना पाहण्यासाठी या गावात मोठी गर्दी उसळली आहे. हत्तींबाबतचे वृत्त कळताच वनविभागाने त्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हे अधिकारी या कळपावर लक्ष ठेवून आहेत.

हत्तींच्या या कळपाने पहिले गडचिरोली इथे मुक्काम केला होता. तिथून ते चंद्रपुरात आल्याचं सांगण्यात येतंय. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र हत्तीचा कळपाने पार केले आणि हा कळप चंद्रपुरात आला. नदी पात्रालगत असलेल्या पिंपळगाव, खरकाडा,निलज गावात हे हत्ती दिसून आले आहेत. ब्रह्मपुरी वनविभागाचे अधिकारी या कळपावर लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

0 Comments