चंद्रपुरात धाडसी चोरी ! एका प्रसिध्द व्यापाऱ्याच्या घरातून तिजोरीसह २१ लाखांची चोरी
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : येथील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीसह २१ लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वच जण घरी असताना चोरट्यांनी तिजोरी कशी काय पळविली, याबाबत पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. चंद्रपूर येथील पूर्ती बाजाराचे संचालक व्यावसायिक गिरीश चांडक यांचे रामनगर परिसरातील रहमतनगर मार्गावर स्वमालकीचे घर आहे. शुक्रवारी त्यांचे कुटुंबीय घरीच होते. दुपारच्या सुमारास घरातील सेफ बॉक्स गायब दिसला. याबाबत त्यांनी घरच्यांना विचारपूस केली. तेव्हा आलमारीतील २१ लाखाची रोकडही गायब असल्याचे समोर आले. घरी चोरी झाल्याचे कळताच त्यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. स्वतः पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांच्या सह डॉग स्कॅड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, सह विविध चमू दाखल झाल्या होत्या. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


0 Comments