बल्लारपूरात १ जानेवारीला भिमा-कोरेगाव दिनानिमित्त विजयस्तभाचे लोकार्पण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


बल्लारपूरात १ जानेवारीला भिमा-कोरेगाव दिनानिमित्त विजयस्तभाचे लोकार्पण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : १ जानेवारी १८१८ ला भीमा नदीच्या तीरावर २८,००० पेशव्याचे सैन्य व ५०० महार सैनिकांचा घनघोर युध्द झाले पेशव्यांच्या काळात अस्पृश्यतेचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जात होते अस्पृश्यना मोठी हीन वागणूक देण्यात येत होती त्याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढले व विजयी झाले अशा प्रकारे ५०० शूरवीर महार सैनिकांच्या मदतीने पेशवाई चा अंत झाला.

       युद्धानंतर ब्रिटीशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भिमा नदीच्या तीरावर ७५ फूट उंचीचा विजयस्तंभ उभारला व त्यावर २० शहीद व ५ जखमी सैनिकांची नावे कोरली आहेत. विशेष म्हणजे महार सैनिकांच्या सन्माणार्थ  १ जानेवारी १९२७ पासून दरवर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी विजयस्तभाला मानवंदना देण्यासाठी येत असत व ही परंपरा आजतागायत सुरू आहे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील बौध्द बांधव हे आपल्या शूरवीर महार योद्धांना मानवंदना देण्यासाठी भिमा-कोरेगावला येत असतात.

        मागील २ वर्षांचा विचार करता व सर्वसामान्य नागरिकांना भिमा-कोरेगाव ला जाण्यास अडचण होत असल्यामुळे बल्लारपूर शहरातील जयभीम चौक परिसरात जेबीबीएस संघटन बल्लारपूर च्या वतीने विजयस्तंभ उभारला जात आहे मागील ४ महिन्यापासून या स्तंभाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे व याचा लोकार्पण सोहळा येत्या १ जानेवारी २०२२ ला होत आहे या कार्यक्रमाला पु.भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या नेतृत्वात भिक्षुसंघ सहभागी होणार आहे. सकाळी ८ वाजताच्या सुमारास बल्लारपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मानवंदना देऊन पदयात्रे द्वारे कार्यक्रम स्थळापर्यंत येणार आहे. तदनंतर सकाळी १० वाजता पु.भदंत ज्ञानज्योती महास्थविर व रिटायर्ड कचरू वेलू सालवे (महार रेजिमेंट) येवला जि. नाशिक यांच्या हस्ते विजयस्तंभाला अभिवादन व लोकार्पण होईल यानंतर दुपारी १ वाजताच्या दरम्यान डॉ.अभिलाषा गावतुरे, प्रा.जावेद पाशा सर, प्रा.दिलीप चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे तर सायंकाळी ५:०० वाजता शाम-ए-कव्वाली झाकीर हुसेन ताजी यांचा गायनाचा कार्यक्रम पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जेबीबीएस विदर्भ चे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments