महावितरण कंपनीचा प्रताप कृषी मीटर न लावताच शेतकऱ्याच्या हातात दिले हजारो रुपयांचे विद्युत बिल
◾शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे काम महावितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत - राजु झोडे
◾न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्याची वंचितचे नेते राजु झोडे यांच्याकडे धाव
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील बामणी या गावातील शेतकऱ्याला महावितरण कंपनीने कृषी मीटर न देताच अवाढव्य बिल हातात दिले व ते न भरल्यास कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
बामणी गावातील नथू विठू साळवे या शेतकऱ्याने शेतीमध्ये कृषी पंप लावण्याकरिता महावितरण कंपनीकडे डिमांड भरून विद्युत मीटरची मागणी केली होती. डिमांड भरून एक वर्ष झाल्यानंतरही महावितरणने या शेतकऱ्याला विद्युत मीटर दिले नाही. शेतकरी विद्युत मीटरसाठी वारंवार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे मागणी करत होता परंतु विद्युत मीटर न देता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला ५८७३ रुपयाचे बिल हातात दिले. व वीजबिल न भरल्यास कारवाई करण्याची धमकी दिली. शेतकऱ्याने हा प्रकार वंचितचे नेते राजू झोडे यांना सांगितला तेव्हा तात्काळ राजू झोडे यांनी प्रशासनास शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा यासंबंधीचे निवेदन दिले. महावितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देऊन आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करत असतात. विद्युत मीटरसाठी डिमांड भरूनही कित्येक वर्षे विद्युत मीटर दिल्या जात नाही. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे काम महावितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत.
महाराष्ट्र शासन व प्रशासनाने विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या समस्या तात्काळ सोडवावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडी एमएसईबी विद्युत कंपनीच्या चुकीच्या धोरणाविरोघात आंदोलन करणार असा इशारा राजु झोडे यांनी तहसीलदार साहेब बल्लारपूर यांना निवेदन देताना बोलत होते. निवेदन देताना राजु झोडे, संपत कोरडे, दिपक नत्थू साळवे,वंदना तामगाडगे, जाकिर खान,नरेश डोंगरे आदि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments