आकस्मिकरित्या मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडने केली आर्थिक मदत

 



आकस्मिकरित्या मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडने केली आर्थिक मदत

  
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  जंगलात लाकुड तोडण्यासाठी गेलेल्या 46 वर्षीय महिलेचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला सदर कुटंुबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालकाची असल्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. यावेेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विश्वजित शाहा, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अॅड. परमहंस यादव, अजय मेश्राम, नितेश बोरकते, राजा डोंगरे, सुरेेंद्र अंचल आदिंची उपस्थिती होती.
    अष्टभुजा वार्डातील इंद्रसन बैजनाथ सोनी ही महिला वार्डातील इतर महिलांसह एमईएल जवळील जंगलात लाकुड तोडण्यासाठी गेली होती. मात्र अचणाक तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी तिला मृत घोषीत केले. मृत महिलेला दोन मुल असून तिच्या खांद्यावर परिवाराची जबाबदारी होती. या घटनेची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना   कळताच त्यांनी मृत महिलेच्या कुटुबींयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच सदर महिलेच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.






Post a Comment

0 Comments